ओबीसी आरक्षणासह निवडणूका व्हाव्यात हीच सरकारची भूमिका - विजय वडेट्टीवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसींचं राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करणार आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणूका व्हाव्यात हीच सरकारची भूमिका असल्याचं इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल सांगितलं.

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. त्यानंतर त्यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली.दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणासाठी समर्पित आयोगासमोर विविध राजकीय पक्षांनी काल आपली भूमिका मांडली.