दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अॅडवोकेट प्रताप परदेशी यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.