वातावरणीय बदलांवर सर्व घटकांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक- आदित्य ठाकरे

 


मुंबई (वृत्तसंस्था) : वातावरणीय बदलांवर उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणं आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येक घटकानं वेगळा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. ते काल मुंबईत 'क्लायमेट चेंज २.० - मोबिलायझिंग फंड फॉर कोस्टल सिटीज' या विषयावर आयोजित दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. इतिहासात काय घडलं, यापेक्षा भविष्यात ते घडू नये यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. कोविडनं माणसाला एकमेकांची मदत करणं शिकविलं, त्याचप्रमाणे वातावरणीय बदल ही आपत्कालीन परिस्थिती असून यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. मुंबई फर्स्ट च्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यानं आयोजित या परिषदेत, मुंबई फर्स्टचे नरेंद्र नायर, युरोपीय संघाचे राजदूत उगो अस्तुतो, आणि जागतिक पातळीवरचे पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित होते.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image