सध्या राज्यात भोंग्याचे नाही तर भोंगळ राजकारण सुरु - मेधा पाटकर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या राज्यात भोंग्याचे नाही तर भोंगळ राजकारण सुरु असल्याची टीका जेष्ठ सामाजीक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी केली आहे. त्या आज नंदुरबार इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.

अस्मितेचे प्रश्न उठवायचे आणि अस्तित्वाचे प्रश्न नाकारायचे, असं सध्याच्या राजकारणाचं स्वरुप झालं आहे, असं त्या म्हणाल्या. एका धर्माच्या मतांचे गठ्ठे मिळवण्यासाठी हि सर्व उठाठेव असुन यातुन एकाच धर्माला लक्ष करण्याचा हा सारा प्रकार अमानवीय असल्याची टीका त्यांनी केली आहे.

मध्यप्रदेश सारख्या राज्यात हिंदु मंदीरांमधुन भल्या पहाटे आरती आणि पुजापाठ होतच असल्याचा दाखला देत  महाराष्ट्रात सर्व भोंगे प्रकरणावर महाविकास आघाडीच्या सरकारने कोणालाही न घाबरता सक्त कारवाईची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भिमा कोरगाव प्रकरणात निरपराध कार्यकर्त्यांनाच गोवलं असल्याचं त्या म्हणाल्या.