प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन या तीन योजनांना सात वर्ष पूर्ण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या तीन जन सुरक्षा योजनांनी विमा आणि पेन्शन सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हंटल आहे. या तीन विमा योजनांना आज सात वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त त्या बोलत होत्या. गेल्या सात वर्षात योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ही या योजनांच्या यशाची साक्ष आहे, असंही त्या म्हणाल्या. या तीन योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सर्व बँका आणि विमा कंपन्यांचं अभिनंदन केलं.