मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 

मुंबई : महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

“महात्मा बसवेश्वर यांनी वर्ण, जात, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा भेदाभेदांना कडाडून विरोध केला. त्यांनी प्रागतिक समाज रचनेचे विचार मांडले. स्त्रियांच्या समानतेचा पुरस्कार केला. अनुभवमंटपद्वारे लोकशाही विचार प्रणाली विकसित केली. त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत,” असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image