माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचं निधन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडित सुखराम यांचं आज दिल्ली इथं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. सुखराम हे १९९३ ते १९९६ पर्यंत दूरसंचार राज्यमंत्री होते. हिमाचल प्रदेशातल्या मंडी लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. तसंच ते पाच वेळा आमदार देखील होते. भारतात मोबाइल क्रांतीचा पाया रचण्याचे श्रेय पंडित सुखराम यांना जातं. त्यांनी देशात मोबाइल सेवा सुरू केली होती.