खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सशर्त जामीन मंजूर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता.

आमदार रवी राणा यांच्याविरोधात १७, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता. मात्र अखेर १२ दिवसानंतर आज त्यांना  जामीन मंजूर झाला आहे.