अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीचं काम वेगानं सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल मंदिराला भेट देऊन बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.  बांधकामाचे तीन टप्पे पूर्ण झाले असून  रामलल्ला मंदिराचं गर्भगृह २०२३ च्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, असं श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.