देशात आतापर्यंत १९२ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९२ कोटी ३४ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८८ कोटी १८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन, तर ३ कोटी १५ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना १० कोटी ४० लाखापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना ४ कोटी ७१ लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून सुमारे साडे ६ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं.