कॅप्टन अभिलाषा बरक ठरल्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला वैमानिक कॅप्टन अभिलाषा बरक या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. अभिलाषा यांच्यासह ३७ अधिकाऱ्यांना आज नाशिक इथं लढाऊ हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून एव्हिएशन विंग्सने सन्मानित करण्यात आलं. भारतीय सैन्यदलाची हेलिकॉप्टर हवाई तुकडी असलेल्या आर्मी एव्हिएशन विंगच्या ३७ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन समारंभ आज नाशिकच्या गांधीनगर विमानतळावर दिमाखात पार पडला आर्मी एव्हिएशन चे डायरेक्टर जनरल आणि कमांडंट लेफ्टनंट जनरल अजयकुमार सुरी हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

३७ व्या तुकडीत प्रशिक्षण यशस्वीपणे प्रशिक्षण पार पडलेल्या प्रशिक्षण काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना हेलिकॉप्टर पायलट म्हणून लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान करण्यात आली सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी कॅप्टन आशिष कटारिया यांना मानाची सिल्वर चित्ता ट्रॉफी, कॅप्टन एस. के. शर्मा यांना बेस्ट फ्लाईंग कॅप्टन, श्रवण मनिला थैया यांना ऑब्झर्वेशन पोस्ट ३५ ट्रॉफी, कॅप्टन पि.के. गौर ट्रॉफीकॅप्टन आर के कश्यप यांना देण्यात आली.  

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image