छायाचित्र प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांची भेट

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई विद्यापीठातल्या सर कावसजी सभागृहात आयोजित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनाला काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. बाळासाहेबांना नवं काही तंत्रज्ञान आलं की, त्याविषयी उत्सुकता असायची आणि माझ्याकडून ते जाणून घ्यायचे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, छायाचित्रण हे गेलेला क्षण पुन्हा जिवंत करून आपल्यासमोर आणतं.

ही जुनी छायाचित्रं पाहिल्यानंतर बाळासाहेबांच्या बरोबरचे ते दिवस आणि तो कालखंड आठवला. बाळासाहेबांच्या नियोजित स्मारकातदेखील जुनी चांगली छायाचित्रे लावायची आहेत. खूप प्रयत्नानंतर बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचं संकलन असलेलं फटकारे पुस्तक प्रकाशित करता आलं, याचं मला खूप समाधान आहे, असंही ते म्हणाले.

मुंबई विद्यापीठाचं श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, सार्थ प्रतिष्ठान आणि मुंबई न्यूज फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीनं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image