कोरोना महामारीच्या काळातही देशातल्या कृषीक्षेत्रानं ३ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांची वाढ नोंदवली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीच्या काळातही देशाच्या कृषीक्षेत्रानं ३ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांची वाढ नोंदवली आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आणि सरकारच्या कृषी क्षेत्राला सहाय्यकारी अशा धोरणांमुळे हे शक्य झालं आहे, असंही ते म्हणाले. 

ते आज भुवनेश्वर इथं एका खाजगी वाहिनीनं आयोजित केलेल्या शेतीविषयक परिषदेत बोलत होते. देशाच्या कृषी उत्पादनाच्या निर्यातीनंही चार लाख कोटींचा टप्पा गाठला असून ही समाधानाची बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं.