आर्थिक संकटग्रस्त श्रीलंकेसाठी भारताकडून तांदूळ, दूध भुकटी आणि औषधांसह मदतीची पहिली खेप रवाना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू सरकारनं जाहीर केल्यानुसार श्रीलंकेसाठी मदत साहित्य घेऊन जाणारं पहिलं जहाज काल चेन्नई बंदरातून रवाना झालं. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या हस्ते या जहाजाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. नऊ हजार मेट्रिक टन तांदूळ, दोनशे टन दूध भुकटी आणि 24 टन अत्यावश्यक औषधे असं साहित्य पाठवण्यात आलं आहे.आर्थिक संकटात असलेल्या श्रीलंकेतील जनतेच्या मदतीसाठी तामिळनाडू सरकारनं  40 हजार मेट्रिक टन तांदूळ, पाचशे मेट्रिक टन दुधाची पावडर आणि जीवरक्षक औषधे जमा केली असून, यातील थोडं साहित्य काल पहिल्या टप्प्यात कोलंबोला पाठवण्यात आलं. लोकांकडून यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान मिळत आहे.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image