विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेतकरी, विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांच्या भेटी ; 360 अंश सेल्फीचे आकर्षण

 

माहिती व जनसंपर्क विभागाच्या  प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित 'दोन वर्षे जनसेवेची,महाविकास आघाडीची' या प्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह  शेतकरी, विद्यार्थी, युवक तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शेतकरी, ग्रामीण भागातील, युवक नागरिकांच्या चांगल्या प्रतिक्रिया

कोरोना महामारी तसेच संकटाच्या काळात सरकारने राबविलेल्या योजना दिलासा देणाऱ्या आहेत. माहिती व जनसंपर्क विभागाने शासनाच्या योजना चित्रमय प्रदर्शनातून लोकांसमोर आणल्या आहेत. प्रदर्शन पाहून आम्हा गावशिवारातील शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी सरकारच्या योजना पाहता आल्या, अशा शब्दात  प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले शेतकरी, ग्रामस्थ यांनी व्यक्त केल्या. तर युवकांनी आपल्या मोबाईलमध्ये माहिती टिपून घेतली.

मान्यवरांच्या प्रदर्शनाला भेटी

पाच दिवसाच्या कालावधीत अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेटी दिल्या.उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रदर्शनाला विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, महाराष्ट्र राज्य सहकार परिषद अध्यक्ष विद्याधर अनास्कर,माजी मंत्री रमेश बागवे यांच्यासह आमदार सुनील शेळके, दिलीप मोहिते, अशोक पवार, संजय जगताप यांनी भेट दिली.

३६० अंश सेल्फीचे आकर्षण

प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले सर्वसामान्य नागरिकांपासून सर्वांनीच प्रदर्शन पाहून झाल्यानंतर ३६० अंश सेल्फी घेतली. आपल्या कॅमेऱ्यात सेल्फी घेत समाज माध्यमातून पाठविण्यात आल्याचेही दिसून आले.

नेटके आणि देखणे आयोजन

माहिती महासंचालक तथा प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शन अत्यंत नेटके आणि देखणे झाल्याचे अनेकांनी सांगितले. माहिती थोडक्यात आणि मुद्देसूद मांडल्याने ती समजून घेणे नागरिकांना शक्य झाले. काहींनी प्रदर्शित योजनेचा तपशील जाणून घेण्यातही रस दाखविला. एकूणच जिल्हाधिकारी कार्यालयाचा सुंदर परिसर आणि प्रदर्शनाचे तेवढेच सुंदर प्रवेशद्वार यामुळे परिसरात येणाऱ्या नागरिकांची पाऊले प्रदर्शनाकडे वळली.

शेवटच्या दिवशी दुपारून नागरिकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. आंतरराष्ट्रीय खेळाडू अंजली भागवत आणि संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांनीदेखील प्रदर्शनाच्या नेटक्या आयोजनाविषयी कौतुक केले. पुणे विभागाचे माहिती उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले

Popular posts
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
अमली पदार्थ नियंत्रण विषयक समन्वय केंद्राची तिसरी उच्चस्तरीय बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार
Image
नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या नोंदणी व पुनर्नोंदणीबाबत आवाहन
Image
एमटीडीसीमार्फत विशेष सवलतींची व पर्यटनस्थळांची माहिती देणारे दालन पर्यटनवृद्धीसाठी महत्त्वाचे – पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती सुनील तटकरे
Image
शेतकरी हितासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला टोमॅटो खरेदीची सूचना
Image