पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना यावर्षी प्रति सिलिंडर 200 रुपये अनुदान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : इंधनांवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करत असल्याची घोषणा काल वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. यामुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर साडे नऊ रुपयांची घट होणार असून डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत.

राज्यांनीही करसवलत लागू करून सामान्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश सीतारामन यांनी दिले आहेत. या वर्षी सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या 9 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना 12 सिलिंडरपर्यंत प्रति गॅस सिलिंडर 200 रुपये अनुदान देईल अशी घोषणाही त्यांनी केली.