शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर होण्यासाठी यंत्रणांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश

 


मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्हा परिषदेच्या तसंच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर व्हावं याकरता शालार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. शिक्षकांच्या वेतनप्रश्नांसदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आमदार कपिल पाटील, आमदार अभिजीत वंजारी, तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.