केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलचं अनावरण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव भारताच्या निर्मितीत डिजिटल इंडियाचं महत्वपूर्ण योगदान असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलचं  अनावरण  करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्र्यांच्या डिजिटल भारता योजनेमुळे प्रशासन कार्यात पारदर्शकता आली आहे, असं त्यांनी सांगितलं.  या पोर्टलचा लाभ उपग्रह वाहिन्या,एफ एम वाहिन्या तसंच कम्युनिटी रेडीओ स्टेशन  यांना होईल, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी  व्यवसाय सरलता यावी या उद्देशानं सुरु केलेल्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यासारख्या योजना अंतर्गत हे पोर्टल  सुरु करण्यात आलं आहे. हे सेवा पोर्टल वाहिन्यांना आवश्यक असणारी परवानगी,  नोंदणी तसंच परवाना एकाच ठिकाणी उपलब्ध करु देणार आहे.