म्यानमारच्या पदच्युत नेत्या आँग सान सू की यांना भ्रष्टाचार प्रकरणी ५ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्यानमारच्या पदच्युत नेत्या आँग सान सू की यांना म्यानमारमधल्या न्यायालयानं भ्रष्टाचाराच्या ११ खटल्यांमध्ये दोषी ठरवत ५ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या आँग सान सू की यांनी पाच वर्ष म्यानमारचे नेतृत्व केल्यानंतर गेल्या वर्षी त्यांना सत्ता सोडावी लागली.

त्यांच्याविरुद्ध १८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्याबद्दल त्यांना सुमारे १९० वर्षांची शिक्षा होऊ शकते. सुमारे साडे अकरा किलो सोनं आणि सहा लाख डॉलर्सची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे आरोप हास्यस्पद असल्याचं सांगत, सू की यांनी ते फेटाळले आहेत. सध्या त्यांना अज्ञात स्थळी ठेवलं आहे. 

आंतरराष्ट्रीय समुदायानं सू की यांच्याविरुद्धच्या खटल्यांवर टिका केली असून, त्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे.