महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतील पदकधारकांना अनुदान मंजूर

 

मुंबई : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक आणि सेवापदक धारकांना शासनामार्फत अनुदान देण्यात येते. या गौरव पुरस्कारास अनुसरून पुणे जिल्ह्यातील लेफ्टनंट जनरल प्रदीप चंद्रन नायर यांना अति विशिष्ट सेवा पदक बहाल करण्यात आले असून या पुरस्काराकरिता 2 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील कर्नल दुश्यंत हणमंत सोनवणे यांना सेवेसाठी सेना पदक बहाल करण्यात आले असून याकरिता 1 लाख 50 हजार रूपये मंजूर करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील शिपाई दीपक तुकाराम सकपाळ यांना शौर्यासाठी सेनापदक बहाल करण्यात आले असून याकरिता 12 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे. या महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेतून अनुज्ञेय ठरविलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम ही शासकिय अनुदानातून तर उर्वरित रक्कम मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून घेण्यात आलेल्या व राष्ट्रीयकृत बँकेत सद्यस्थितीत गुंतविण्यात आलेल्या रकमेच्या व्याजातून अदा करण्यात येणार आहे. याबाबतचा शासननिर्णय साप्रवि चे दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी निर्गमित केला आहे.

Popular posts
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश लागू
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image