उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवर नव्यानं भोंगे लावण्यास बंदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या धार्मिक स्थळांवर यापुढं नव्यानं भोंगे लावण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसंच धार्मिक मिरवणुकीत शस्त्रास्र प्रदर्शनालाही बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

परवानगी घेतलेल्या भोंग्याचा आवाजही धार्मिक स्थळाच्या बाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. प्रशासनाच्या परवानगी शिवाय कुठलीही धार्मिक मिरवणूक काढता येणार नाही. त्यासाठी धार्मिक सलोखा बिघडवणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र आयोजकांना द्यावं लागेल.