पक्कं घर हा चांगल्या भविष्याचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पुनर्प्रतिपादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पक्कं घर हा चांगल्या भविष्याचा पाया असल्याचं पुनर्प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या एका लाभार्थ्याला लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलय की, लाभार्थ्यांच्या आयुष्यातले हे अविस्मरणीय क्षण देशाच्या सेवेसाठी अथक काम करत राहण्यासाठी प्रेरणा देत आहेत. घर म्हणजे केवळ विटा आणि सिमेंटचा सांगाडा नसून भावना आणि आकांक्षा त्याच्याशी जोडलेल्या असतात. घराच्या भिंती केवळ सुरक्षाच नव्हे, तर उद्या चांगले दिवस येण्याचा विश्वास देतात, असंही त्यांनी म्हटलय. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी लाभार्थ्यांना पक्की घर मिळाली आहेत. प्रत्येक गरजू कुटुंबाला घर देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून देशातल्या जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सरकार गांभीर्यानं प्रयत्न करत आहे, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.