केंद्रीय विद्यालयात प्रवेशासाठीची कोटा पद्धत रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय विद्यालयात २०२२- २३ या वर्षात प्रवेशासाठीची कोटा पद्धत रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. कोटा पद्धतीतून संसद सदस्यांनी निर्देशित केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश दिला जात होता.

पुढच्या आदेशापर्यंत सर्व प्रकारच्या कोटा प्रवेशावर बंदी घालण्याच्या केंद्रीय विद्यालय संघटनेच्या निर्णयानंतर केंद्र सरकारन हा आदेश जारी केला आहे. यापूर्वी ,  एका विशेष अधिकारानुसार संसद सदस्य आपल्या मतदारसंघातल्या १० विद्यार्थ्यांची केंद्रीय विद्यलयात प्रवेशासाठी शिफारस करू शकत होते.