पिटर्सबर्ग येथे गोळीबारात २ अल्पवयीन मुले ठार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतल्या पिटर्सबर्ग इथल्या एअरबिएनबी भा़ड्याच्या घरात झालेल्या गोळीबारात २ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला असून, इतर आठजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे २०० लोकं एका मोठ्या पार्टीदरम्यान जमलेले असताना हा गोळीबार झाला.

गेल्या नऊ दिवसात तिसऱ्यांदा एअरबिएनबीच्या भाड्याच्या घरांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी सॅक्रामेन्टो, कॅलिफोर्निया आणि ह्युस्टन इथं गोळीबाराच्या घटना घडल्या ज्यात एक तरुण मृत्यूमुखी पडला.