राज्यात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांची संख्या ५० पेक्षा कमी

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल  कोविड-१९ च्या ४१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर, ८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे काल एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ७५ हजार २११ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७७ लाख २६ हजार ६६३ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४७ हजार ८१६ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ७३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, जळगाव, नंदुरबार, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, आणि चंद्रपूर जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण नाही. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. 

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image