२ वर्षांनंतर हापूस आणि इतर आंब्यांची पहिली खेप अमेरिकेला रवाना

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्ष जवळपास ठप्प असलेल्या देशातल्या आंब्याच्या निर्यातीला पुन्हा वेग आला आहे. अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाच्या देखरेखीखाली यंदाच्या हंगामातली आंब्याची पहिली खेप अमेरिकेला पोहोचली आहे. हापूस, केसर आणि बंगनापल्ली या जातींचे आंबे अमेरिकेला रवाना झाले आहेत.