भारतामध्ये २०३० पर्यंत १ त्रिलीयन डॉलरच्या वस्तू आणि सेवा निर्यात करण्याची क्षमता- पियुष गोयल

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २०३० पर्यंत एक लाख कोटी अमेरिकन डॉलरची वस्तू आणि सेवा निर्यात करण्याची भारताची क्षमता असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल २१ व्या लोकसेवा दिनानिमित्त आयोजित आत्मनिर्भर भारत-निर्यातीचं उद्दिष्ट या विषयावरील सत्राला संबोधित करताना बोलत होते. निर्यातीला भरताच्या विकासाचा आधार बनवण्याची गरज आहे या मुद्द्यावर त्यांनी यावेळी भर दिला.मार्च महिन्यात भारतानं ४२ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा टप्पा गाठला असल्याचं त्यांनी सांगितलं.