आषाढी वारीसाठी सर्व विभागाने समन्वय ठेवून नियोजन करण्याच्या सूचना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग कमी झाल्याने आणि निर्बंध हटविल्याने यंदाच्या आषाढी वारीला मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. ही आषाढी वारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. याकाळात वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक स्वछता, पिण्याच्या पाण्याची सोय अशा अनेक क्षेत्रात नियोजन कसे करावे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केल. आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत शंभरकर बोलत होते.