जगातली सर्वात तरुण अभियांत्रिकी शक्ती हेच भारताचं सर्वात मोठं सामर्थ्य- नितीन गडकरी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या हिरे आणि दागिने उद्योग क्षेत्रामध्ये विकासाची पूर्ण क्षमता असून या क्षेत्राची निर्यात २५ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा गाठू शकते असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत अखिल भारतीय हिरे आणि दागिने स्थानिक परिषदेच्या प्रदर्शनात बोलत होते. कोविडोत्तर काळात जग व्यापारासाठी भारताला प्राधान्य देत असून जगातली सर्वात तरुण अभियांत्रिकी शक्ती हेच भारताचं सर्वात मोठं सामर्थ्य असल्याचं ते यावेळी म्हणाले. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांची निर्यात ५० टक्क्यावर जाण्याची आवश्यकता असून स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातला त्याचा वाटा ४० टक्के असायला हवा असं ते म्हणाले. हिरे उद्योगातले कुशल कारागीर कमी मोबदल्यात उत्तम काम करत असून महाराष्ट्र, गुजरात आणि अन्य राज्यांमधल्या कौशल्य वृद्धीमुळे देशात बनवलेल्या दर्जेदार  उत्पादनाला जगभरात मोठी मागणी असल्याचं ते म्हणाले.