२ मे पासून राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातल्या शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी २ मे पासून राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुटी लागू होणार आहे. तर, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात १३ जूनला शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. जून महिन्यातलं विदर्भाचं तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तिथल्या शाळा २७ जूनला सुरू होतील. याबाबतचं परिपत्रक काल जारी केलं आहे. त्यानुसार, इयत्ता पहिली ते नववी, आणि ११ वी चा निकाल ३० एप्रिल किंवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल. उन्हाळ्याची आणि दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून, त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ यासारख्या सणांच्याप्रसंगी ती समायोजनानं, संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीनं घेता येईल. मात्र शैक्षणिक वर्षातल्या सर्व प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढं दरवर्षी, राज्यातल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारी, तर विदर्भात जून महिन्यातल्या चौथ्या सोमवारी सुरु होतील. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल तर त्यानंतरच्या दिवशी शाळा सुरू होतील, असंही या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image