डीएचएफएल-येस बँक भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून प्रमुख बांधकाम व्यावसायिकांच्या घरांची झडती

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीएचएफएल-येस बँक भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं आज मुंबई आणि पुण्यातील आठ ठिकाणी अश्विनी भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्यासह काही प्रमुख बांधकाम व्यावसायिकांच्या घरांची झडती घेतली. येस बँक-DHFL कर्ज प्रकरणातील कथित बेकायदेशीर पैसे व्यवहारात आणण्यासाठी या  कंपन्यांचा वापर केला जात असल्याचा संशय केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी रेडियस डेव्हलपर्सच्या संजय छाब्रियाला नुकतीच अटक केली आहे.