राष्ट्र हिताला सरकारच्या कामकाजात सर्वोपरी आणि सर्वोच्च महत्त्व - नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्र हिताचं सरकारच्या कामकाजात सर्वोपरी आणि सर्वोच्च महत्त्व असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. भाजपाच्या ४२ व्या स्थापना दिवस समारंभात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. देशाला धोरण, हेतू आणि निर्णायकता असते आणि सरकार फक्त उद्दिष्ट तयार करत नाही तर ती पूर्ण करतं असं त्यांनी स्पष्ट केलं.

देशानं अलीकडेच ४०० अब्ज अमेरिकी डॉलरची वस्तू निर्यात केली आहे. आत्तापर्यंतची ही सगळ्यात मोठी निर्यात आहे, असं ते म्हणाले. चार राज्यात भाजपाचं डबल इंजिन सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. गेल्या तीस वर्षात राज्यसभेत भाजपानं १०० सदस्यांचा टप्पा गाठला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.