एलआयसीद्वारे ४ ते ९ मे दरम्यान देशातली सर्वात मोठी समभाग विक्री

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एलआयसी अर्थात भारतीय जीवन वीमा महामंडळाचा IPO अर्थात प्राथमिक समभाग विक्री पुढच्या आठवड्यात होणार आहे. येत्या बुधवारपासून सुरू होणारी ही समभागांची प्राथमिक विक्री ९ मे पर्यंत सुरू राहील. यात गुंतवणूकदारांना ९०२ रुपये ते ९४९ रुपयांच्या किंमत पट्ट्यामध्ये किमान १५ समभागांसाठी बोली लावावी लागेल. किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना यात ४५ रुपये तर एलआयसीच्या ३० कोटी वीमाधारकांना ६० रुपये सवलत मिळेल.  त्यानंतर १७ मे रोजी हा समभाग देशातल्या शेअर बाजारांमध्ये खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध होईल. २२ कोटी १३ लाख समभागांच्या विक्रीच्या माध्यमातून सरकार एलआयसीमधल्या त्यांच्या साडेतीन टक्के हिश्श्याची विक्री करणार आहे. बाजारातून भांडवल उभारणीचा विचार करता हा देशातला सर्वात मोठा IPO ठरणार आहे, अशी माहिती निर्गुंतवणूक सचिव तुहीन कांत पांडे यांनी दिली. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image