युक्रेनमध्ये युद्धविराम करुन राजनैतिक मार्ग आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याची भारताची भूमिका - डॉ. एस जयशंकर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन संघर्षाबाबात भारताची भूमीका स्पष्ट असून ताबडतोब युद्धविराम करुन राजनैतिक मार्ग आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु करावा यावर भारताचा भर असल्याचा परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज रायसीना संवादात बोलत होते.

श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, आशियासमोर स्वतःचीच अनेक आव्हानं आहेत, आणि त्यांचा परिणाम नियामाधीष्ठीत व्यवस्थेवर होतो. याबाबतीत त्यांनी अफगानिस्तानचं उदाहरण दिलं. वेगवेगळ्या देशांसाठी प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. त्याचबरोबर जगाच्या इतर भागांमध्ये उद्धभवलेल्या समस्यांचा दबावही त्यांच्यावर असतो. अफगानिस्तान, युक्रेन महासत्तांमधलं वैमनस्य आणि कोविड यांचा परिणाम संपूर्ण जगावर आणि प्रत्येक व्यक्तीवर होत आहे, असं त्यांनी सांगितलं. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image