समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा गृहमंत्र्यांचा इशारा

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कायदा सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी जरी सरकारची असली तरी गेल्या काही दिवसांपासून ही शांतता बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तरी कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये, त्याचप्रमाणे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. असं काही घडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सांगितलं. भोंगाच्या परवानगी बाबत सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये निर्देश दिले. २०१५ आणि १७ मध्ये राज्य सरकारनी काही शासकीय आदेश काढले आहेत. त्याच्या अंमलबजावणीच्या सूचना देण्यात येतील असंही ते म्हणाले.या संदर्भात आपण लवकरच राज्यातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षांची आणि संघटनांची बैठक बोलावणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.