पंडित दीनदयाळ ऊपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार ग्रामपंचायतींना जाहीर

 


मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित पंडित दीनदयाळ ऊपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातल्या भंडारवाडी ग्रामपंचायतीला गौरव ग्रामसभा पुरस्कार जाहीर झाला. या ग्रामपंचायतीनं २०२०-२१ या वर्षात ग्रामसभा, वार्डसभा, महिला ग्रामसभा, वार्षिक ठराव, ग्रामपंचायत अभीलेखांचं अद्यावतीकरण या बाबतीत केलेल्या कामगीरीसाठी हा पुरस्कार मिळाला. बावी, खानापूर, धारूर या तीन ग्रामपंचायतींना पंडित दिनदयाळ ऊपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे. या तीनही ग्रामपंचायतींनी सर्व ग्रामसभा तसंच ग्रामपंचायतीच्या इतर कामांचं केलेलं संगणकीकरण, यासोबतच कर वसुली, अभिलेखांचं अद्ययावतीकरण, सरकारी योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्यानं, पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार मिळाल्यानं आता या ग्रामपंचायतींना मार्गदर्शक ग्रामपंचायतींचा दर्जा दिला जाणार आहे. येत्या २३ एप्रिलला पंचायतराज दिनाच्या दिवशी पुरस्कारांचं वितरण होणार असल्याचं जिल्हा परिषदेनं कळवलं आहे.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image