लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्राचं खेरी जिल्हा कारागृहात आत्मसर्मपण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी आशिष मिश्रा यानं आज लखीमपूर खेरी जिल्हा कारागृहात आत्मसमर्पण केलं. सर्वोच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात आशिष मिश्राला या प्रकरणी दिलेला जामीन रद्द करून आठवडाभरात आत्मसमर्पण करायला सांगितलं होते.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष गेल्या वर्षी झालेल्या लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. आशिषने जामीन कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी न्यायालयात आत्मसमर्पण केलं.