देशात आतापर्यंत १८५ कोटी ७१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १८५ कोटी ७१ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८३ कोटी ८५ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन, तर २ कोटी ३० लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ९ कोटी ७२ लाखापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना २ कोटी २३ लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून ७ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात आज सकाळपासून ५३ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १६ कोटी २५ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी ८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा, तर १९ लाख ३० हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली. १५ ते १८  वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना ६३ लाख ३४ हजारापेक्षा जास्त, तर १२ ते १४ या वयोगटातल्या लाभार्थ्यांना १७ लाख २१ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. देशभरात काल कोविड-१९ चे ८६१ नवे रुग्ण आढळले, तर ९२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी २५ लाखाच्या वर गेली आहे. देशात कोविड-१९ रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७६ शतांश टक्के आहे. सध्या देशभरात ११ हजार ५८  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.