मार्च महिन्यात १ लाख ४२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवाकर संकलन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मार्च महिन्यात आतापर्यंतचं सर्वात जास्त, म्हणजे १ लाख ४२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवाकर संकलन झालं आहे. यात केंद्रीय वस्तू आणि सेवाकराचा वाटा २५ हजार ८३० कोटी रुपये, तर राज्य वस्तू आणि सेवाकराचा वाटा ३२ हजार ३७८ कोटी रुपयांचा आहे. एकात्मिक वस्तू आणि सेवाकराचं संकलन ७४ हजार ४७० कोटी रुपये, तर आधिभार ९ हजार ४१७ कोटी रुपये जमा झाले आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात १ लाख ४० हजार ९८६ कोटी रुपये करसंकलन झालं होतं. हा विक्रम मार्चमधे मोडला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं सांगितलं. गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या करसंकलनापेक्षा यावेळी मार्चमधलं करसंकलन १५ टक्के जास्त आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image