भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर स्वाक्षरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या  आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर अर्थात  इंडस एक्टवर काल  स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या उपस्थितीत, भारतातर्फे  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आणि ऑस्ट्रेलियाचे व्यापार, पर्यटन आणि गुंतवणूकमंत्री डॅन तेहान, यांनी, दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या समारंभात स्वाक्षरी केली.

या करारामुळे दोन्ही देशांतील विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांना सुलभता होईल, ज्यामुळे हे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image