आय़पीएल मधल्या मुंबई इंडियन क्रिकेट संघाचा रोहित शर्मा ठरला कर्णधार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय़पीएल मधल्या मुंबई इंडियन क्रिकेट संघाचा कर्णधार  रोहित शर्मा, टी-ट्वेंटी क्रिकेटमधे १० हजार धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी विराट कोहलीनं हा टप्पा ओलांडला आहे. रोहितनं काल रात्री पुण्यात पंजाब किंगविरुद्ध झालेल्या सामन्यात ही कामगिरी साध्य केली. अशी कामगिरी करणारा तो जगातला दहावा फलंदाज आहे. या यादीत १४ हजार ५६२ धावांसह वेस्ट इंडिजचा फलंदाज क्रिस गेल अग्रस्थानी आहे. त्याच्यापाठोपाठ पाकिस्तानचा शोएब मलिक, वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड, ऑस्ट्रेलियाचा ऐरॉन फिंच, विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर यांचा क्रमांक लागतो.