भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम ; लाभार्थी शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन
• महेश आनंदा लोंढे
पुणे : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाद्वारे सामाजिक न्याय भवन येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातील सहायक संचालक लेखा व वित्त मारुती मुळे, समाज कल्याण अधिकारी मीना अंबाडेकर, सहायक आयुक्त संगीता डावखर, डॉ.गौतम बंगाळे, मल्लिनाथ हरसुरे, दिपाली ढोरजे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.बंगाळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तर श्री.शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्यावर व्याख्यान दिले.
गणेश केळगंद्रे या विद्यार्थ्याने ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक विचार’ या विषयावर विचार व्यक्त केले, तर मनोज भोईवार याने बासरी वादनाद्वारे भीमगिते सादर केली. प्रास्ताविकात श्रीमती डावखर यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजनेची माहिती दिली. त्यांच्या हस्ते ‘पुणे विद्यापीठाच्या नामकरणाचा प्रेरणादायी इतिहास’ आणि ‘बाबासाहेबांची पत्रकारिता’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी योजनेच्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.