देश आज स्वच्छतेचे नवे अध्याय लिहित आहे : पंतप्रधान

 

नवी दिल्ली : लोकसहभागाने देशाच्या विकासाला नवी उर्जा प्रदान केली आहे आणि स्वच्छ भारत अभियान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

देशभरात शौचालयांची उभारणी असो, कचऱ्याची विल्हेवाट लावणे असो, ऐतिहासिक वारशाचे जतन असो किंवा स्वच्छताविषयक स्पर्धा असो, या सर्वांच्या माध्यमातून देश आज स्वच्छतेच्या क्षेत्रात नवे अध्याय लिहित आहे असे ते म्हणाले.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“लोकसहभागामुळे एखाद्या देशाच्या विकासाला कशा प्रकारे नवी उर्जा मिळते याचे स्वच्छ भारत अभियान हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. शौचालयांची उभारणी असो किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावणे असो, ऐतिहासिक वारशाचे जतन असो किंवा स्वच्छताविषयक स्पर्धा असो, आज देश स्वच्छतेच्या बाबतीत नवनव्या कथा लिहित आहे.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image