जागतिक व्यापार संघटनेनं सहमती दर्शवली तर भारत जगाला अन्नधान्याचा पुरवठा करायला तयार - प्रधानमंत्री

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक व्यापार संघटना अर्थात डब्ल्यूटीओनं सहमती दर्शवली तर भारत जगाला अन्नधान्य पुरवायला तयार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी झालेल्या चर्चेत आपण याबाबतचा प्रस्ताव मांडला होता असं मोदी यांनी सांगितलं. युक्रेन युद्धामुळे जगातल्या अनेक भागात अन्नधान्याचा तुटवडा जाणवत आहे या पार्श्वभूमीवर भारतानं ही तयारी दर्शविली आहे. गुजरातमध्ये अडालज इथल्या माँ अन्नपूर्णा धाम ट्रस्ट नं उभारलेल्या शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन काल प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून अन्न, आरोग्य आणि शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व दिलं असून भारतातले शेतकरी केवळ देशातल्याच नव्हे तर जगभरातल्या नागरिकांना अन्नधान्य पुरवठा करत आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले.