महाराष्ट्र हे महिलांना आदर सन्मान देऊन नेतृत्वाला संधी देणारे राज्य- डॉ. नीलम गोऱ्हे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे महिलांना आदर सन्मान देऊन नेतृत्वाला संधी देणारे राज्य आहे. या राज्यातील महिलांच्या रक्तात आणि आत्म्यातच नेतृत्वगुण भिनला आहे, असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं.

महाराष्ट्रातल्या नवनिर्वाचित सदस्यांकरिता नवी दिल्लीमध्ये प्राइड संस्था आणि लोकसभा सचिवालय यांच्यावतीनं आयोजित केलेल्या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. विधिमंडळ सदस्यांसाठी आयोजित केलेले प्रशिक्षण हे नक्कीच भावी प्रवासात मार्गदर्शक ठरेल, असंही त्या म्हणाल्या. या प्रशिक्षणाला महाराष्ट्रातून १०० पेक्षा अधिक नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांनी हजेरी लावली आहे. 



Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image