आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पी.व्ही. सिंधूला कांस्यपद

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पी.व्ही. सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. मनिला इथं उपांत्य फेरीतल्या आज तिला अव्वल मानांकित आणि गतविजेत्या जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव स्वीकारावा लागला. सिंधूनं कालच उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हे बिग जिओचा पराभव करत चॅम्पियनशिपमध्ये पदक निश्चित केलं होतं.