जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला देशाच्या लष्करप्रमुख पदाचा पदभार
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी आज पदभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे हे देशाचे २९ वे लष्कर प्रमुख असून अभियांत्रिकी कोअरमधून या पदावर नियुक्ती होणारे पहिले लष्करी अधिकारी आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यावर १९८२ साली जनरल पांडे यांची अभियांत्रिकी कोअरमध्ये नियुक्ती झाली. जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पालनवाल सेक्टरमध्ये लष्करानं केलेल्या ‘ऑपरेशन पराक्रम’ या कारवाईत जनरल पांडे यांनी अभियांत्रिकी रेजिमेंटचं नेतृत्व केलं होतं. आपल्या ३९ वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत जनरल पांडे यांनी पश्चिम अभियांत्रिकी ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ, लडाखमधे माउंटन डिव्हिजन आणि ईशान्य कोअरचं नेतृत्व केलं. दरम्यान आज सकाळी मावळते लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांना आज सकाळी नवी दिल्ली इथं लष्करानं गार्ड ऑफ ऑनरनं सन्मानित केलं. लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज नरवणे यांनी दिलेल्या योगदानामुळे देशाचं लष्करी सामर्थ्य आणि सामरिक तयारी मजबूत झाल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.