लहान शेतकरी,महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी कटिबद्ध - प्रधानमंत्री
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरात मधल्या बनासकांठा जिल्ह्यातल्या दियोदार इथं अनेक विकास कामांचं लोकसमर्पण तसंच भूमिपूजन झालं.
प्रधानमंत्र्यांनी बनास डेअरी संकुल, बटाटा प्रक्रिया संयंत्र,जैविक खत आणि बायोगॅस संयंत्र यांचं उदघाटन केलं, तर ४ गोबर गॅस प्रकल्पांची पायाभरणी केली. व्होकल फॉर लोकलचं उत्तम उदाहरण असलेले हे प्रकल्प ग्रामीण अर्थव्यवस्था आणखी सक्षम करतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रकल्प पारंपरिक साधन सामुग्रीतून आधुनिक उत्पादनं तयार करताना रोजगाराच्या संधीही निर्माण करतील, असंही ते म्हणाले.
गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आणि महिलांना सक्षम करण्यात बनास डेअरी हे एक महत्वाचं केंद्र ठरत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तिथे मध उत्पादन उद्योगही विकसित होत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपलं सरकार नेहमीच कार्यरत आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी यावेळी बनास कम्युनिटी रेडिओ केंद्राचंही उदघाटन केलं. शेतकऱ्यांना पशुपालन आणि शेतीविषयी वैज्ञानिक माहिती मिळावी या उद्देशानं हे केंद्र सुरु करण्यात आलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.