देशातल्या प्रौढ नागरिकांना ३७५ रुपयात खासगी लसीकरण केंद्रात मिळणार लशीची वर्धक मात्रा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत खाजगी लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरच्या लाभार्थ्यांना दिली जाणारी वर्धक मात्रा आता कमाल ३७५ रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. सीरम इन्स्टिट्युट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी खाजगी रुग्णालयांसाठीच्या लसींच्या दरात मोठी कपात करत असल्याची घोषणा आज केली.

सीरम इन्स्टिट्यूटनं आपल्या कोविशिल्ड या लसीचा दर ६०० रुपयांवर २२५ रुपये इतका कमी केला आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

भारत बायोटेकनही कोवॅक्सिन या लसीचा दर १ हजार २०० रुपयांवरून २२५ रुपये इतका कमी केला असल्याचं, भारत बायोटेकच्या व्यवस्थापकीय सहसंचालक सुचित्रा इला यांनी सांगितलं. तर आरोग्य सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार खाजगी रुग्णालयांना लसींच्या आखून दिलेल्या किंमतीपलिकडे, लसीकरण सेवा शुल्क म्हणून जास्तीत जास्त दीडशे रुपयांचं शुल्क आकारता येणार आहे. 

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image