डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचं राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुराभिलेख संचालनालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शनाचं मंत्रालयातलेया त्रिमूर्ती प्रांगणात  सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या प्रदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरील महत्त्वपूर्ण घटना असणारे अभिलेख आणि छायाचित्रांचं चित्रण प्रदर्शित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाला सर्वसामान्य नागरिक आणि इतिहासाचे अभ्यासक, तसंच वाचक वर्गानं भेट द्यावी, असं आवाहन पुराभिलेख संचालनालयाच्या संचालकांनी केलं आहे.